Thursday, August 7, 2008

मानवी संस्कृती आणि शिवधर्म

आरंभीच्या रानटी अवस्थेतून मानवाच्या जीवन प्रवासाला सुरवात झाली .निसर्गाच्या सानिध्यात अन्नाच्या मुलभुत गरजेसाठी मानवाने अवलोकन आणि आकलन याद्वारे अनेक शोध लावले.यातूनच त्याला हत्यारांची गरज भासली.ही गरजही मानवाने कालानुक्रमे उपलब्ध नैसर्गिक साधनांद्वारे पूर्ण केली.मानवी उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर मानवाची हत्यारे बदललेली दिसतात.आरंभी माणूस वस्त्रहीन होता.कालानुक्रमे त्याने वल्कले, झाडाच्या साली,मोठ मोठी पाने यांचा वस्त्र म्हणुन वापर केला. कृषिचा शोध लागल्यानंतर अनेक पिके घेण्यासाठी मानवाने जंगलातिलच वान शोधून काढले.

आदिमकाली प्राथमिक मानव समाजाचे सांस्कृतिक अवशेश आजही काही वन्य वा मूलनिवासी समाजाच्या सांस्कृतिक जीवनात आढलतात. प्राचीनकाली गणव्यवस्थेत प्रत्येक कुलाचा स्वातंत्र्य परिचय व्हावा अशी कुल नामे अस्तित्वात होती.

शिवमानवाने लाखो वर्षांच्या निसर्ग साह्चार्याने स्वीकारलेल्या सांस्कृतिक आचरनातून जी शिवसंस्कृती निर्माण झाली.त्याच संस्कृतीला इतिहासकारानी सिंधूसंस्कृति असे नाव दिले आहे.

मात्रुदेवता शक्ती

विविध प्रकारच्या विपुल स्त्री मूर्ति व मुद्रा उत्खननात मिलाल्या आहेत.स्त्री देवता ह्या संस्कृतीतील आराध्य दैवत होत्या हे सिद्ध होते

सिंधू संस्कृती ही नागरी संस्कृती होती.नगरे समृद्ध होती.नगराना आर्थिक जीवनात प्राधान्य होते.कृषि व पशुपालन,उद्योग व व्यापार हे त्यांचे मुख्य व्यवसाय होते.